October 5, 2022

डेप्युटी सीईओ काकडे यांची बदली !

डेप्युटी सीईओ काकडे यांची बदली !

बीड- जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे.ग्रामविकास विभागाने यांच्यासह नऊ जणांच्या बदलीचे आदेश बुधवारी दिले.

बीड जिल्हा परिषदेच्या स्वछता आणि पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक प्रदीप काकडे हे त्यांच्या कार्यपद्धती मुळे वादग्रस्त ठरले होते.जल जीवन मिशन मध्ये ठराविक गुत्तेदार मंडळींवर मेहरबानी केल्याप्रकरणी काकडे यांचे नाव चर्चेत आले होते.तसेच स्वच्छ भारत मिशन योजनेत देखील ठराविक गुत्तेदारांना कामे दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

दरम्यान ग्रामविकास विभागाने 20 सप्टेंबर रोजी राज्यातील नऊ गट विकास अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तात्पुरती पदोन्नती दिली आहे.यामध्ये काकडे यांच्यावर जालना येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click