बीड- शहरातील सिमेंट रस्ते आणि नाल्यांच्या कामाचा शुभारंभ बीडचे आ संदिप क्षीरसागर यांच्या हस्ते मंगळवारी झाला.तब्बल 70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने शहर वासीयांची खड्यातून मुक्तता होण्यास मदत होणार आहे.
बीडच्या विकासाचा पाया मजबुत करण्यासाठी शहरातील नागरिकांची कामे चालु करण्याबाबतची वारंवार मागणी वाढत असल्यामुळे मंजुर असलेले व कार्यारंभ आदेशीत असलेले खालील 12 कामांची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रुपये 70 कोटींच्या विकासकामांचे उदघाटने व शुभारंभ प्रशासकीय अधिकारी, मान्यवर व स्थानिक नागरिकांच्या उपस्थिती संपन्न झाला.
उद्यापासून सर्व कामांना तात्काळ सुरुवात होणार आहे.
आंबिका चौक ते अर्जुन नगर सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.
राजीव गांधी चौक व्यंकटेश स्कुल ( करपरा नदीपुल ) सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.
राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा ते खोलवाट सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.
बार्शी रोड ते दिप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.कासट ते शहर पोलीस स्टेशन ते अश्विनी दवाखाना सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.
मसरत नगर ते नेत्रधाम ते सावरकर चौक सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.
पेठ बीड पोलीस स्टेशन ते ईदगाह सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.
नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.
बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा
सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.
बार्शी रोड, मुक्ता लॉन्स ते तकीया मस्जिद ते फ्रुट मार्केट ते खासबाग देवी रोड (लेंडी नाका) सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.
अंकुश नगर ते पाण्याची टाकी पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे.
शितल वस्त्र भांडार मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजूने रस्ते सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे,या सर्व कामांचा शुभारंभ आ क्षीरसागर यांनी केला.