धारूर – निकालाची प्रत काढून देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक सरकारी वकील सुरेखा लांब यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
सुरेखा लांब या धारूर न्यायालयात सहायक सरकारी वकील म्हणून कामकाज पाहतात.एका प्रकरणात फिर्यादिस निकालाची प्रत काढून देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती.याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
लाच मागीतल्याबाबत खात्री झाल्यावर विभागाने सापळा रचून सुरेखा लांब यांना ताब्यात घेतले.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.