October 5, 2022

बचाव पथकातील जवानासह डॉक्टर फपाळ यांचा मृतदेह सापडला !

बचाव पथकातील जवानासह डॉक्टर फपाळ यांचा मृतदेह सापडला !

बीड- बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणामध्ये बुडालेल्या डॉक्टरचा शोध घेताना कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवानही बुडाला आहे. बुडालेल्या जवानाचे विजय मोरे असे नाव असून तब्बल 30 ते 35 तासांच्या शोधकार्यानंतर डॉ फपाळ यांचा मृतदेह सापडला आहे.

काल सकाळी माजलगाव धरणात पोहायला गेलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा मृतदेह 24 तासानंतरही बचाव पथकाला मिळालेला नाही. मात्र या बचावकार्यादरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना घडली. एनडीआरएफच्या कोल्हापूर येथील बचाव पथकातील कर्मचारी राजू मोरे हे देखील मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकले.

बचाव कार्य करत असताना ते ऑक्सिजन सिलींडरसह पाण्यात उतरले होते. मात्र मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात ते अडकल्याने त्यांना ओढून बाहेर काढत असताना त्यांचा ऑक्सिजन सिलिंडर निसटून वर आला. नंतर त्यांचा मृतदेह हाती लागला.. दुसऱ्या एका बुडालेल्या कर्मचाऱ्याला महत्प्रयासांनी बाहेर काढण्यात आले असून त्याच्यावर माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. स्वतः जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा हे घटनास्थळी दाखल होऊन पाण्यात उतरले होते.सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास डॉ फपाळ यांचा मृतदेह सापडला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click