October 5, 2022

यंदा कारखाने लवकर सुरू होणार !

यंदा कारखाने लवकर सुरू होणार !

बीड – गतवर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनल्याने साखर संघाने यावर्षी ऑक्टोबर पासूनच कारखाने सुरू व्हावेत यासाठी नियोजन सुरू केले आहे.ज्या भागात जास्त ऊस लागवड झाली आहे त्या भागातील कारखाने ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात दसरा ते दिवाळी या दरम्यानच ऊस हंगाम सुरू होईल, अशी शक्यता आहे. राज्यात यंदा १४ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाची तोडणी झाली होती. यामुळे जवळ जवळ गेल्या वर्षीसारखी स्थिती राज्यभर आहे. यामुळेच राज्य शासनाने नियोजनाचा भाग म्हणून एक ऑक्टोबरपासून ऊसतोडणी सुरू करण्याचे ठरवले आहे.

या बाबत प्रशासन पातळीवरून तयारीही सुरू केली आहे. या महिन्यात हंगाम सुरू करण्यास पावसाबरोबरच ऊस पिकाची अपरिपक्वता ही महत्त्वाची बाब ठरते. यामुळे या महिन्यात शक्यतो करून कारखाने हंगाम सुरू करण्यास फारसे तयार नसतात. ऊस पट्ट्यात प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनांचे वर्चस्व असल्याने या संघटनांच्या ऊस परिषदाही आहेत. हंगामाच्या प्रारंभासाठी त्या ही महत्त्वाच्या ठरतात. एकंदरीत परिस्थितीचा विचार केल्यास दसऱ्यानंतरच गाळप हंगाम सुरू होईल, असे कारखाना प्रतिनिधींचे मत आहे.

राज्य सरकारने जरी नियोजन केले असले तरी मजुरांची उपलब्धता, पाऊस, तांत्रिक बाबी याचा विचार करता दसरा ते दिवाळी दरम्यानच हंगाम सुरू होऊ शकतो, अशी माहिती कारखाना सूत्रांनी दिली. साखर आयुक्तालयाने गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची सूचना केली आहे. तथापि, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील समिती सप्टेंबरच्या मध्यापर्यंत यावर निर्णय घेईल, असा अंदाज आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click