बीड- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे शेतकरी एकजूट संघर्ष समिती बीड जिल्हाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.आ प्रकाश सोळंके,आ संदिप क्षीरसागर यांनी यावेळी नेतृत्व केले.जिल्हाधिकारी कार्यालयावर आज किसान सभेच्या वतीने देखील आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
बीड व शिरूर कासार विधानसभा क्षेत्रातील अनेक मंडळाचा यात समावेश करावा.सर्व महसुल मंडळ सर्कलमधील 25 टक्के अग्रीम देण्याची अधिसुचना जिल्हाधिकारी यांनी काढावा.सरासरी पेक्षा जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. गोगलगायच्या प्रार्दूभावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई लवकरत लवकर देण्यात यावी.सध्या लंपी या जनावरंच्या रोगाने जिल्ह्यात थैमान घातले आहे यासाठी उपाय योजना म्हणून प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध करून देण्यात यावी.
भरपावसात शेतकरी एकजूट संघर्ष समिती व अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयसमोर झाले. झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी भरपावसात शेतकरी एकीची ताकद दाखवून देत आहेत . शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा/अग्रीम लवकर मिळावा. जिल्हातील व मतदारसंघातील बंद पडलेली विकासकामे लवकर सुरु व्हवीत यासाठी शासनाने बीड जिल्ह्याला लवकर पालकमंत्री द्यावेत.आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी आ प्रकाश सोळंके,आ संदिप क्षीरसागर, माजी आ अमरसिंह पंडित यांच्यासह कॉ अजय बुरांडे व इतरांची उपस्थिती होती.