September 30, 2022

सीईओ पवारांनी सुबेआ साठीची अटच रद्द केली !

सीईओ पवारांनी सुबेआ साठीची अटच रद्द केली !

बीड- जल जीवन मिशन च्या टेंडर प्रक्रियेत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना 90 लाखाच्या कामापर्यंत विना अनुभव सहभागी होण्याची अट सीईओ तथा टेंडर समिती प्रमुख यांनी रद्द केली आहे.त्यामुळे आता सुबेआ ना 90 लाखपर्यंतची कामे करता येणार नाहीत.सीईओ यांनी ही अट कोणाच्या फायद्यासाठी रद्द केली अशी चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेनातील योजना असलेल्या जल जीवन मिशन मध्ये बीड जिल्ह्यात सीईओ अजित पवार,कार्यकारी अभियंता डी एच डाखोरे आणि प्रकल्प संचालक प्रदीप काकडे यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे.

गेल्या 392 कामांपैकी 300 पेक्षा अधिक कामे ठराविक आठदहा कंत्राटदार यांना दिल्यानंतर आता नव्याने 112 कामांचे टेंडर काढण्यात आले आहे. यामध्ये 37 कामे सुबेआ म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यासाठी राखीव आहेत तर उर्वरित कामे सर्वसाधारण कंत्राटदार यांच्यासाठी राखून ठेवण्यात आली आहेत.

हे टेंडर काढताना त्यामध्ये 37 क्रमांकाची जी आत होती त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की सुबेआ हे 90 लाखाच्या कामापर्यंत विना अनुभव टेंडर भरू शकतील.त्यानंतर 300 लक्ष पेक्षा अधिकच काम करण्यासाठी अनुभव प्रमाणपत्र द्यावे लागेल.

गेल्या चार पाच दिवसापासून जल जीवन मिशन मध्ये बीड जिल्ह्यात जो गोंधळ सुरू आहे त्याबाबत न्यूज अँड व्युज ने मालिका सुरू केली.त्यामुळे सुबेआ वर जाणीवपूर्वक अन्याय करण्याचे धोरण प्रशासनाने हाती घेतले आहे.सीईओ पवार यांनी शुद्धीपत्रक काढून टेंडर मधील अट क्र37 रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

अगोदरच बीड जिल्ह्यात सुबेआ वगळून ठराविक गुत्तेदारांचे लाड करण्याचे उद्योग सुरू आहेत.कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय असो की इतर आठ दहा गुत्तेदार यांच्यावर मेहरबानी केली जात आहे.आता सुबेआ साठीची अट रद्द करण्यामागे नेमका प्रशासनाचा हेतू काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click