December 10, 2022

चोवीस तासानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ !

चोवीस तासानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ !

बीड- शहरातील नगर रोड भागातून एका पिग्मी एजंट ची दोन लाख रुपयांची बॅग सोमवारी दुपारी चोरीला गेली.तब्बल 24 तास उलटून गेले तरीदेखील याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी साधी तक्रार देखील दाखल करून घेतली नाही.उलट तक्रार द्यायला गेलेल्या एजंट ला उलटसुलट प्रश्न विचारून बँकेच्या मॅनेजरला ठाण्यात बोलावून तक्रार द्यायला सांगण्याचा प्रताप पोलिसांनी केला आहे.पैशाची बॅग चोरीला गेल्याने अगोदरच हैराण असलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांच्या या वागणुकीने जास्तच त्रास सहन करावा लागला आहे.

एखादा सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेला तर त्याला सन्मानजनक वागणुक द्यावी,आल्यावर बसण्यास खुर्ची देऊन पाणी द्यावे,आस्थेवाईकपणे त्याची चौकशी करून त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे.पोलीस आपले मित्र आहेत अशी भावना त्याच्या मनात जागृत होईल असे वागावे असे निर्देश आहेत.

मात्र बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संतोष कुलकर्णी नामक पिग्मी एजंट ला जी वागणूक दिली गेली ती पाहिल्यावर भीक नको पण कुत्रा आवर अस म्हणण्याची वेळ आली आहे.कुलकर्णी हे आदल्यादिवशीचे कलेक्शन सोबत घेऊन सोमवारी कलेक्शन करत करत बँकेकडे निघाले होते.दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलीस ग्राउंड समोरील कलेक्शन घेत असताना गाडीला लावलेली 2 लाख 10 हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली.

ही गोष्ट लक्षात आल्यानंतर कुलकर्णी पाच वाजण्याच्या दरम्यान शिवाजीनगर पोलिसात तक्रार द्यायला गेले.त्यावेळी पैशाचे विवरण घेऊन या अस सांगत त्यांना परत पाठवण्यात आले. सायंकाळी विवरण घेऊन ठाण्यात गेलेल्या कुलकर्णी यांच्या बँकेच्या मॅनेजरला ठाण्यात पाचारण केले गेले.

मॅनेजरला तुम्ही तक्रार द्या असे सांगण्यात आले,त्यानंतर एजंट आणि मॅनेजर दोघेही निघून गेले.दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी रात्रीपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यात आला नव्हता.

ज्या व्यक्तीची पैशाची बॅग चोरीला गेली त्याला जर पोलीस ठाण्यात या पद्धतीने वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसाने पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा आणि फिर्याद द्यायला जायचे की नाही याचे उत्तर कोण देणार ?

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click