परळी – बहीण भावाच्या भांडणात आपल्या सख्या भाच्याचा निर्घृणपणे खून करणाऱ्या मामा ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेने परळी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
केज तालुक्यातील लाडे वडगाव येथील सुरेखा कंरंजकर या आपल्या आईला आणि भावाला भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या.परळी शहरानजीक असलेल्या नागपूर कॅम्प मध्ये सुरेखा यांचा भाऊ लक्ष्मण चिमनकर याच्या घरी आल्या होत्या.सोबत चार वर्षाचा मुलगा कार्तिक देखील होता.
लक्ष्मण आणि सुरेखा यांच्यात गायरान जमिनीच्या वादातून भांडण झाले,त्यानंतर सगळे झोपी गेले.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कार्तिक च्या ओरडण्याचा आवाज आल्याने सुरेखा ला जाग आली तेव्हा कार्तिक रक्ताच्या थारोळ्यात होता.
आपल्या मुलाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तोपर्यंत कार्तिक चा मृत्यू झाला होता.या घटनेने परळी परिसरात खळबळ उडाली आहे.परळी पोलिसांनी मामा लक्ष्मण चिमनकर याला अटक केली आहे.