December 10, 2022

माणसांना दिले जनावरांचे इंजेक्शन अन औषधी !

माणसांना दिले जनावरांचे इंजेक्शन अन औषधी !

बीड- बीड जिल्ह्यातील एका बोगस डॉक्टर ने रुग्णांना चक्क जनावरांची औषधे आणि इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.राजेंद्र जवंजाळ असे त्या बोगस डॉक्टर चे नाव असून त्याला पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच शिरूर येथील डॉ बडजाते विरुद्ध कारवाई झाली होती.

पाथर्डी तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे एका बोगस डॉक्टरने तब्बल ४० माणसांना चक्क जनावरांचे इंजेक्शन दिल्याचे उघड झाले आहे. आपण स्वतः डॉक्टर असल्याचे सांगत राजेंद्र जवंजाळ या व्यक्तीने जनावरांचे औषध वापरून ४० हून अधिक महिला व पुरूषांना पाठ, गुडघा व मानेला इंजेक्शन दिले. या बोगस डॉक्टरला गावातील काही जागरूक तरूणांनी पकडून तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बाबासाहेब होडशीळ यांच्या ताब्यात दिले आहे.

तिसगाव येथे या डॉक्टरांच्या बॅगेतील औषधांची खातर जमा झाल्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजेंद्र सदाशिव जवंजळे ( रा. जिल्हा बीड) असे पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. करंजी जवळील खंडोबावाडी येथे गेल्या दोन दिवसापासून राजेंद्र जवंजळे हा डॉक्टर म्हणून या गावात आलेल्या व्यक्तीने मानेचे, गुडघ्याचे पाठीचे दुखणे ज्या नागरिकांना आहे त्यांना नेमकी दुखणार्‍या जागेवरच इंजेक्शन देऊन प्रत्येक व्यक्तीकडून पाचशे रुपये उकळत होता. गेल्या दोन दिवसापासून हा बोगस डॉक्टर या गावातील नागरिकांना इंजेक्शन टोचण्याचे काम करत आहे. गावातील काही तरुणांनी या डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चिन्ह आढळून आली.

संबंधित व्यक्तीकडील औषधांचा पंचासमक्ष पंचनामा केल्यानंतर या व्यक्तीला पाथर्डी पोलीस स्टेशनला नेण्यात आले त्या ठिकाणी या बोगस डॉक्टरच्या विरोधात तिसगावचे डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या फिर्यादीवरून या बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. या बोगस डॉक्टरला तिसऱ्याच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाठवले होते आणि तो हे माणसांच्या जीवाशी खेळणारे काम करत असल्याचे आढळून आले आहे यात आणखी भयानक म्हणजे हा तिसरा व्यक्ती या बोगस डॉक्टर कडून दररोज कमिशन म्हणून एक हजार रुपये घेत होता आता त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click