December 10, 2022

जल जीवन मिशन लुटण्याचा डावकर चा डाव !

जल जीवन मिशन लुटण्याचा डावकर चा डाव !

बीड- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील योजनेला सुरुंग लावण्याचे काम जालिंदर डावकर सारखे बोगस गुत्तेदार करत आहेत.बोगस कागदपत्रे सादर करून रजिस्ट्रेशन मिळवून बोगस कामे करणाऱ्या डावकर वर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी बांधकाम सभापती युध्दाजित पंडित यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन ची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.ग्रामीण पाणी पुरवठा, जल जीवन मिशन आणि सीईओ यांनी बोगस गुत्तेदार मंडळींवर विशेष कृपादृष्टी दाखवली आहे.जालिंदर डावकर कन्स्ट्रक्शन कंपनी च्या नावाने रजिस्ट्रेशन करून डावकर नामक व्यक्तीने धुडगूस घातला आहे.

या डावकर च्या रजिस्ट्रेशन, बँक गॅरंटी, शैक्षणिक कागदपत्रे,बोगस अनुभव प्रमाणपत्र, बोगस वर्क डन प्रमाणपत्र, कर्मचारी यादी बोगस दाखवलेली आहे.माजी बांधकाम सभापती युध्दाजित पंडित यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.

जालिंदर डावकर हा बोगस गुत्तेदार आहे,त्याच्याकडे ना अनुभव आहे ना कोट्यवधींची कामे करण्याची आर्थिक क्षमता,पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री देखील नसताना कार्यकारी अभियंता, सीईओ आणि प्रकल्प संचालक यांनी डावकर वर एवढी मेहरबानी का दाखवली असा सवाल पंडित यांनी उपस्थित केला आहे.

तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून काम करणाऱ्या जालिंदर डावकर ला अधिकाऱ्यांनी मेहरबानी करत आणि पैसे खाऊन शासकीय गुत्तेदार म्हणून रजिस्ट्रेशन मिळवून दिले.आज हाच डावकर बोगस कामे करून कोट्यवधी रुपये शासनाची फसवणूक करत आहे.

एकच व्यक्ती तांत्रिक सेवा पुरवठादार आणि शासकीय गुत्तेदार म्हणून काम करू शकतं नाही असा आरोप करत डावकर याचे रजिस्ट्रेशन रद्द करून खोटे कागदपत्रे देऊन शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी पंडित यांनी केली आहे.

डावकर याला बोगस कामे करण्यासाठी सहकार्य करणारे तत्कालीन कार्यकारी अभियंता, तसेच विद्यमान कार्यकारी अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा आणि जल जीवन मिशन कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी युध्दाजित पंडित यांनी केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click