December 10, 2022

नारायणा स्कुल बंद करण्याचे आदेश मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ !

नारायणा स्कुल बंद करण्याचे आदेश मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ !

बीड- शहरातील कॅनॉल रोडवर असलेल्या नारायणा स्कुल ला शिक्षण विभाग आणि राज्य सरकार यांची परवानगी नसल्याने शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले आहेत,मात्र या शाळेला दंड करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हास्तरीय सदस्य सय्यद ख्वाजा यांनी केला आहे.

मूळ हैदराबाद येथील नारायणा स्कुल ची बीड येथे यावर्षी पासून शाळा सुरू करण्यात आली आहे.या शाळेत जवळपास 270 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.मात्र या शाळेला जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि राज्य सरकारची परवानगी नसल्याचे समोर आले.

याबाबत सय्यद ख्वाजा यांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाने तीन लोकांची समिती नेमून तपासणी केली.ज्यामध्ये शाळेला शिक्षण विभागाच्या वतीने दिला जाणारा यु डायस नंबर नसल्याचे आणि राज्य सरकारची परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यानुसार शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी शाळेला पत्र देत तातडीने शाळा बंद करावी तसेच शाळेतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची इतर शाळेमध्ये सोय करावी असे आदेश दिले आहेत.

परंतु हे करताना शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार शाळेला एक लाख रुपये दंड आणि प्रतिदिन दहा हजार रुपये दंड करण्यात आलेला नाही तसेच विना परवानगी शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.अशाप्रकारे अर्धवट कारवाई करण्यामागे शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचा नेमका हेतू काय आहे,ते कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत असा सवाल सय्यद ख्वाजा यांनी उपस्थित केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click