January 30, 2023

बीडमध्ये डायलिसीस सेंटर ! रोटरी चा मेगा प्रोजेक्ट !!

बीडमध्ये डायलिसीस सेंटर ! रोटरी चा मेगा प्रोजेक्ट !!

बीड- सातत्याने समाजोपयोगी कार्यात व्यस्त असणाऱ्या रोटरी इंटरनॅशनल आणि रोटरी क्लब ऑफ बीड च्या वतीने बीडमध्ये मेगा प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. जिल्हाभरातील रुग्णांसाठी बीडमध्ये मोफत डायलिसिस सेंटर 10 सप्टेंबर पासून रुग्णसेवेत सुरू होणार आहे अशी माहिती रोटरी चे माजी प्रांतपाल हरीश मोटवानी, अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सचिव सुनील जोशी,वाय जनार्दन राव आणि डॉ संतोष शिंदे यांनी दिली.

बीड जिल्ह्यात च नव्हे तर देशात कोठेही मूत्रपिंडाचा आजार असणाऱ्या रुग्णांना डायलिसिस साठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो.अनेकवेळा रुग्णाची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याला उपचार करणे अशक्य होते. मोठं मोठ्या शहरात या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात.

बीड सारख्या शहरात ही सुविधा नसल्याचे लक्षात आल्यानंतर रोटरी क्लब ऑफ बीड ,रोटरी क्लब अंबाजोगाई, रोटरी क्लब अहमदनगर, रोटरी क्लब मियामी एयरपोर्ट, कुटे ग्रुप ,हॉटेल अन्विता आणि प्रिया एजन्सीज यांच्या सहकार्याने डायलिसिस सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बीड शहरातील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये पाच डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.प्रत्येक महिन्याला दोनशे डायलिसिस मोफत केले जातील, त्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना किमान 900 आणि पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना 1200 रुपयात डायलिसिस करता येईल .

गरजू रुग्णांनी विजय एजन्सीज बीड,बीड शेती सुधार केंद्र पेठ बीड,गणेश उडपी,बीड,आविष्कार कोचिंग क्लासेस बीड,कॉम्प्युटर वर्ल्ड अंबाजोगाई, यशवन्त क्रिटिकल केयर माजलगाव,चिद्रवार ज्वेलर्स, धारूर,व्यंकटेश हॉस्पिटल,वडवणी आणि योगिता नर्सिंग होम केज येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

येत्या 10 सप्टेंबर रोजी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एका कार्यक्रमात डायलिसिस सेंटर चे लोकार्पण होईल .।

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click