बीड- राज्य सरकारचा महत्वाकांक्षी असलेल्या स्काऊट गाईड चळवळीला बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे.ज्या शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्याकडे मुख्य आयुक्त पदाची सूत्र वर्षभर होती त्यांनी ना इतर सहकारी अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले ना बैठक घेतली.स्काऊट ला वाऱ्यावर सोडण्यामागे कुलकर्णी यांचा नेमका हेतू कोणता होता अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
बीड जिल्हा स्काऊट गाईड चे आयुक्त म्हणून शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची नोव्हेंबर2021 साली वर्षभरासाठी नियुक्ती झाली.त्यांच्यासोबत विक्रम सारूक (स्काऊट),प्रणिता गंगाखेडकर (गाईड) चे जिल्हा आयुक्त म्हणून नेमले गेले.
तसेच अजय बहिर,मोहन काकडे,प्रवीण काळम पाटील हे स्काऊट चे जिल्हा मुख्यालय आयुक्त तर मैना बोराडे,अरुणा काळे, प्रणिता कापसे,मुमताज पठाण यांची नियुक्ती गाईड चे मुख्यालय आयुक्त म्हणून झाली.त्यांच्यासोबत जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट म्हणून महादेव आंबरुळे,तर जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड म्हणून अलका शिंदे यांची नियुक्ती झाली.
मुख्य आयुक्त आणि इतरांना सहकार्य करण्यासाठी अभिमन्यू इबीते,महादेव शेंडगे,विष्णू विधाते आणि तुकाराम पवार यांची सहायक जिल्हा आयुक्त स्काऊट पदावर नियुक्ती झाली.त्यासोबत सहायक जिल्हा आयुक्त गाईड म्हणून सुनंदा घुले,अनिता जोगदंड,राजश्री लाहोर आणि वंदना हिरे यांची 1 नोव्हेंबर2021 रोजी नियुक्ती करण्यात आली.
या चळवळीला बळकटी मिळावी म्हणून प्रशासकाची नियुक्ती रद्द करून शिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु श्रीकांत कुलकर्णी यांनी मात्र या जबाबदारी कडे पाठ फिरवली. ज्या सहकारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक होते त्यांना साधे नियुक्तीपत्र देखील वर्षभरात द्यायला कुलकर्णी यांना वेळ मिळाला नाही.
ज्या चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त आणि प्रामाणिक पणाचे तसेच देशसेवेचे धडे दिले जातात ती चळवळच मोडीत काढून या योजनेला हरताळ फसण्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे.याकडे वरिष्ठ लक्ष देतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.