December 10, 2022

सरकार बदललं अन एसआरटी च्या एमआरआय मशीनच घोड अडल !

सरकार बदललं अन एसआरटी च्या एमआरआय मशीनच घोड अडल !

बीड- मराठवाड्याची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात आठ नऊ महिन्यांपूर्वी येऊन पडलेली एमआरआय मशीन वीज कनेक्शन अभावी धूळखात पडून आहे.तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी डीपीडिसी मधून तरतूद देखील केली होती मात्र सरकार बदललं अन डीपीडिसी रद्द झाली.त्यामुळे ही मशीन अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी खेचून आणला.अंबाजोगाई येथील रुग्णालयात अत्याधुनिक अशी तब्बल 17 कोटी रुपयांची एमआरआय मशीन मुंडे यांच्या काळात मंजूर झाली अन रुग्णालयाला प्राप्त देखील झाली.

मात्र महावितरण आणि रुग्णालय प्रशासन यांच्या वादात मशीन चार सहा महिने धूळखात पडून होती.याबाबत न्यूज अँड व्युज ने आवाज उठवल्यानंतर मुंडे यांनी यासाठी तातडीने 74 लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद केली.त्यामुळे ही मशीन लवकर रुग्णसेवेत दाखल होईल असे वाटले होते.

परंतु राज्यात सत्तांतर झाले अन नव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच्या डीपीडिसी चा निधी रोखला.त्यामुळे या मशिनसाठी केलेली तरतूद लांबली.गेल्या आठ नऊ महिन्यापासून ही मशीन या ठिकाणी येऊन पडली आहे.अकरा केव्ही लाईन आणि कनेक्शन यासाठी पैसे नसल्याने मशीनचा उपयोग सुरू झालेला नाही.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि अंबाजोगाई च्या आमदार नमिता मुंदडा यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.कारण ही मशीन सुरू झाली तर केवळ बीडच नव्हे तर लातूर, परभणी येथील रुग्णांना देखील याचा लाभ होणार आहे.नव्या सरकारकडून या मशीनच्या विद्युतीकरण साठीचा निधी तातडीने उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click