बीड- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जल जीवन मिशन या योजनेचा बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी बट्याबोळ केला आहे.बीडच्या खासदार असोत की सर्व आमदार यांना सुद्धा अंधारात ठेवून अधिकारी गुत्तेदारांचे चांगभले करत आहेत.
बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या जागेवर प्रशासक मंडळ आल्यानंतर सीईओ अजित पवार यांच्या हाती कारभार आला.हा कारभार येताच आपण म्हणजे या जिल्ह्याचे राजे,मालक आहोत अशा थाटात कारभार सुरू आहे.
विशेषतः जल जीवन मिशन योजना प्रत्येक गावात राबविण्याच्या नावाखाली अंदाधुंद कारभार सुरू आहे.जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या जवळचे किंवा मार्जितले असे काही खास गुत्तेदार आहेत.त्यांची बीड कपॅसिटी आहे की नाही,कागदपत्रे पूर्ण आहेत की नाही?त्यांनी यापूर्वी जी कामे केली आहेत त्याचे वर्क डन प्रमाणपत्र आहेत की नाही याची कुठलीही खातर जमा न करता या अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांचे भले केले.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हे यापूर्वी मंत्री राजेश टोपे यांच्या मतदारसंघात नोकरीस होते,तेथे त्यांनी सुरळीत काम केल्याची माहिती आहे मात्र बीडला आल्यावर ते नेमकं कोणाच्या दबावात काम करत आहेत ,की त्यांनाही बीडचे पाणी लागले अशी चर्चा होत आहे.
बीड जिल्ह्यात भाजपच्या खा प्रीतम मुंडे आहेत तर धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके,संदिप क्षीरसागर आणि बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.नमिता मुंदडा आणि लक्ष्मण पवार हे दोघे भाजपचे आमदार आहेत.मात्र या लोकप्रतिनिधी ना विश्वासात न घेता या कामाचे वाटप झाले असावे अशी शंका येत आहे.
जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी हे मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने झटत असताना एव्हढीमोठी योजना राबविताना त्यांना का डावलण्यात आले अशी चर्चा सुरू झाली आहे.।