बीड- जल जीवन मिशन ची कामे मिशन मोड वर पूर्ण करायची या नावाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डाकोरे हे मनमानी कारभार करत आहेत.त्यामुळे या डाकोरेना कोणीतरी नियम दाखवा रे म्हणण्याची वेळ आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पूढे आलेल्या जल जीवन मिशन योजनेचा पुरता बोजवारा बीड जिल्ह्यात उडाला आहे.केवळ जास्तीत जास्त गावात कामे करायची असा दिखावा करत अधिकारी या योजनेची वाट लावत आहेत.
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय करताना हे अधिकारी जिल्हा परिषदेच्या नियमांना हरताळ फासत आहेत.एका गुत्तेदाराला किती कामे द्यावीत,त्याला कामे देताना बीड कपॅसिटी तपासणे आवश्यक आहे.एवढेच नाही तर वर्क डन असल्याशिवाय नवे काम देऊ नये असे नियम आहेत.
मात्र सीईओ अजित पवार यांची दिशाभूल करत जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक काकडे,कार्यकारी अभियंता डाकोरे यांनी नवाच खेळ मांडला आहे.साध्याजे गुत्तेदार काम करत आहेत त्यांनाच आणखी कामे दिली जात आहेत.साधा डिप्लोमा असलेले हे लोक एवढी कामे करू शकतात का,त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा,पुरेसे संख्याबळ आहे का याचा विचार कार्यकारी अभियंता म्हणून डाकोरे यांनी करायला पाहिजे.
मात्र टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली नियम डावलून कामे दिली जात आहेत.या प्रकरणात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.