बीड । वार्ताहर
विजेच्या तारेला चिटकून आई सह दोन लेकरांचा मृत्यू झाल्याची र्हदयद्रावक घटना गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथे घडली आहे. तर दुसरी घटना चौसाळ्यात घडली आहे .गिझरचा शॉक लागून एका इसमाचा मृत्यू झाला आहे.
गेवराई तालुक्यात भेंड टाकळी येथील तांड्यावरील महिला ललिता श्रीकांत राठोड ही आपला मुलगा प्रशांत श्रीकांत राठोड आणि अभिजीत श्रीकांत राठोड या तिघांसह घराचे घराशेजारी पडलेल्या विजेच्या तारेला चिटकून मृत्यू पावले ऐन सणासुदीच्या दिवसात एकाच घरातील तिघेजण मृत्यू पावल्यामुळे भेंडटाकळी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
अन्य एका घटनेत चौसाला येथील तारेक अजीज कुरेशी यांचा गीझर चा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.