September 30, 2022

टेंडर समितीच्या आले मना तेथे कोणाचेच चालेना !

टेंडर समितीच्या आले मना तेथे कोणाचेच चालेना !

बीड- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन ची कामे नियमबाह्य पध्दतीने वाटप केली जात आहेत.टेंडर समितीने निर्णय घ्यायचा अन मर्जीतल्या गुत्तेदाराला काम वाटप करायचे असा धंदा मांडला आहे.बोटावर मोजण्याऐवढ्या गुत्तेदारांचे भले करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे की काय अशी शंका यामुळे येत आहे.

देशभरात प्रत्येक गावात अन प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन ही योजना सुरू केली.बीड जिल्ह्यात या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत.

मात्र ही कामे वाटप करताना नियम डावलले जात आहेत.एका एका गुत्तेदाराकडे किमान पाच पेक्षा अधिक गावातील कामे आहेत.वास्तविक पाहता एका गुत्तेदाराला तिनपेक्षा अधिक कामे वाटप करता येत नाहीत.या तीन पैकी एक काम पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल घेऊन पुढील काम वाटप करणे हा नियम आहे.

परंतु जिल्हा परिषद सीईओ,कॅफो,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा या चौघांची जी टेंडर समिती आहे त्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे.कोणतेही काम करताना जे नियम पाळले गेले पाहिजेत ते धाब्यावर बसवून ग्रामीण पाणी पुरवठा विभागात अंदाधुंदी कारभार सुरू आहे.

एका एका गुत्तेदाराकडे पाच दहा कामे असल्याने सगळी कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांचाकडे तेवढी यंत्रणा उपलब्ध होऊ शकत नाही. अशावेळी कामे अर्धवट राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरुंग लागू शकतो.

केवळ आपल्या घरातील किंवा जवळच्या गुत्तेदारावर हे अधिकारी एवढी मेहरबानी का दाखवत आहेत अशी शंका उपस्थित केली जात आहे.या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click