बीड- पारदर्शकतेचा मुखवटा धारण करत निवडण्यात आलेल्या आदर्श शिक्षकांची यादी लिक झाल्याने खळबळ उडाली आहे. विभागीय आयुक्त यांच्या मंजुरिला जाण्यापूर्वी च या निवड होऊ घातलेल्या आदर्श गुरुजींच्या अभिनंदनाच्या पोस्टने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.जिल्हा परिषदेत काहीच गोपनीय राहू शकत नाही,कारण इथल्या बहुतांश विभागांचा कारभार कार्यालयाबाहेरून चालतो हेच या यादी लिक मुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणात पुन्हा एकदा सीईओ अजित पवार कोणा कोणाला पाठीशी घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा असो की आरोग्य विभाग अथवा सामान्य प्रशासन विभाग येथील कारभारामुळे जिल्हा परिषदेची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.त्यातच आता शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचा कारभार चहाचे हॉटेल,पान टपरी आणि धब्यावरून चालतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, शिंदे यांच्या समितीने आदर्श शिक्षक निवडण्यासाठी प्रक्रिया राबवली.यावर्षी पदाधिकारी यांच्या हाती कारभार नसल्याने अधिकारी मेरिट वर योग्य शिक्षकांचा सन्मान करतील ही अपेक्षा होती.
पाच ते सहा तास चाललेल्या या निवड प्रक्रिये नंतर प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक यांची यादी फायनल झाली.मात्र ही प्रक्रिया गोपनीय असल्याने पुरस्कार जाहीर होतील तेव्हाच कळणार असा सगळ्यांचा समज होता.
परंतु बीड जिल्हा परिषदेच्या कोणत्याच विभागातील कोणतीच माहिती गोपनीय राहू शकत नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. बीड जिल्हा परिषदेने निवड केलेल्या आदर्श शिक्षकांच्या चारित्र्य पडताळणी आणि पोलीस वेरिफिकेशन साठी यादी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवली होती त्यानंतर ही पडताळणी पूर्ण झाल्यावर ही यादी विभागीय आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार होते
ही यादी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यापूर्वीच सोशल मीडिया मधून वायरल झाली असून ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे किंवा त्यांचे नाव यादीत आहे अशा सर्वांच्या अभिनंदन आमच्या पोस्ट फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
विभागीय आयुक्तांच्या मंजुरी शिवाय जर यादी लीक झाली असेल तर याला शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी त्यांचे कर्मचारी हे जबाबदार आहेत की यादी पोलीस अधीक्षक कार्यालयातून लीग झाली याची चौकशी करण्याचे धाडस आणि दोषींवर कारवाई करण्याची हिम्मत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार दाखवतील काय अशी चर्चा होत आहे