December 10, 2022

कालावधी संपत आला तरी स्काऊट ची बैठक नाही !

कालावधी संपत आला तरी स्काऊट ची बैठक नाही !

बीड- जिल्हा स्काऊट गाईड च्या कारभाराकडे जिल्हा आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे समोर आले आहे.तब्बल वर्षभरापूर्वी नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांनी एक साधी बैठक देखील घेतलेली नाही.नियुक्तीचा कालावधी संपला तरीदेखील जिल्हा आयुक्तांसह कोणालाच बैठकीसाठी वेळ कसकाय मिळाला नाही अशी चर्चा सुरू झाली आहे .

राज्य शासनाचा अधिकृत उपक्रम असलेल्या भारत स्काऊट गाईड कडे बीड जिल्ह्यात अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.बीड जिल्हा स्काऊट गाईड चे आयुक्त म्हणून शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची नोव्हेंबर2021 साली वर्षभरासाठी नियुक्ती झाली.त्यांच्यासोबत विक्रम सारूक (स्काऊट),प्रणिता गंगाखेडकर (गाईड) चे जिल्हा आयुक्त म्हणून नेमले गेले.

तसेच अजय बहिर,मोहन काकडे,प्रवीण काळम पाटील हे स्काऊट चे जिल्हा मुख्यालय आयुक्त तर मैना बोराडे,अरुणा काळे, प्रणिता कापसे,मुमताज पठाण यांची नियुक्ती गाईड चे मुख्यालय आयुक्त म्हणून झाली.त्यांच्यासोबत जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट म्हणून महादेव आंबरुळे,तर जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड म्हणून अलका शिंदे यांची नियुक्ती झाली.

मुख्य आयुक्त आणि इतरांना सहकार्य करण्यासाठी अभिमन्यू इबीते,महादेव शेंडगे,विष्णू विधाते आणि तुकाराम पवार यांची सहायक जिल्हा आयुक्त स्काऊट पदावर नियुक्ती झाली.त्यासोबत सहायक जिल्हा आयुक्त गाईड म्हणून सुनंदा घुले,अनिता जोगदंड,राजश्री लाहोर आणि वंदना हिरे यांची 1 नोव्हेंबर2021 रोजी नियुक्ती करण्यात आली.

हे सर्व शिक्षण विभागातील अधिकारी आहेत.यांचा कार्यकाळ 31 ऑक्टोबर रोजी संपत आहे.म्हणजेच गेल्या वर्षभरात यापैकी एकही अधिकाऱ्याने स्काऊट गाईड कडे नजर वर करून देखील पाहिलेले नाही.विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षभरात कोरोना काळ असल्याने या अधिकाऱ्यांना फिल्डवरील कामाचा ताण कमी होता .तरीदेखील या अधिकाऱ्यांनी स्काऊट गाईड कडे लक्ष दिले नाही.

जिल्हा परिषदेच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी याकडे स्वतः जातीने लक्ष देऊन ही चळवळ पुन्हा बळकट कशी होईल हे पाहणे आवश्यक आहे.

शासनाचे क्रीडा आयुक्त ज्या उपक्रमाचे राज्य आयुक्त आहेत त्या उपक्रमाकडे शासकीय अधिकारी एवढ्या निष्काळजीपणे कसकाय दुर्लक्ष करू शकतात हे संशोधनाचा विषय आहे.अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्काऊट गाईड ची लोकोपयोगी चळवळ थांबली आहे.शासन या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असताना शिक्षणाधिकारी असोत की इतर अधिकारी अशा पध्दतीने कसकाय दुर्लक्ष करू शकतात याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click