बीड- दिंद्रुड पोलीस ठाण्यात नोकरीस असलेल्या महिला कर्मचाऱ्याचा आणि मुलाचा भीषण अपघातात मृत्यू झाला परळी बीड महामार्गावर दोन चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली यामध्ये या दोन्ही मायलेकरांचा दुर्दैवी अंत झाला
आजारी असलेल्या आपल्या नववर्षीय मुलास रुग्णालयात नेण्यासाठी कार घेऊन परळी कडे निघालेल्या दिंद्रुड येथील पोलीस शिपाई कोमल शिंदे यांच्या कारचा समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी सोबत भीषण अपघात झाला यामध्ये दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले अपघात एवढा भीषण होता हे कोमल शिंदे आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला या अपघातात दोन्ही गाडीतील अन्य दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर परळीच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत