बीड- बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने जिल्हाभर अवैध धंद्यावर छापे घालण्याचा धडाका लावला आहे.बीड शहर पासून ते परळी,अंबाजोगाई अशा अनेक ठाण्यांच्या हद्दीत गुटखा असो की मटका सगळ्या धंद्यावर कारवाई होत आहे.मात्र त्या त्या ठिकाणचे ठाणेदार नेमकं काय करतात.का ते कलेक्शन मध्येच व्यस्त आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.ज्या ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकाकडून कारवाई होईल त्या ठानेप्रमुखांवर कारवाई केल्यासच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होतील.हे पाऊल एसपी ठाकूर उचलणार का अशी चर्चा सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबत थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडली आहे हे राज्यातील जनतेसमोर आले होते.त्यानंतर तत्कालीन एसपी आर रामस्वामी यांची बदली झाली.
त्यांच्या जागी रुजू झालेल्या नंदकुमार ठाकूर यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले.या पथकाने बीड शहर हद्दीत मटका अड्यावर, माजलगाव हद्दीत गुटख्याच्या तस्करांवर, पेठ बीड हद्दीत गुटखा, अंबाजोगाई हद्दीत दारू,परळी हद्दीत पत्याच्या क्लब वर धाडी घातल्या.
एकीकडे एसपी चे विशेष पथक छापे घालते मात्र स्थानिक पोलीस अधिकारी अन कर्मचारी नेमकं करतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच काही ठराविक ठाण्याच्या हद्दीतच विशेष पथक कसकाय कारवाई करते अस देखील बोललं जातं आहे.
जिल्ह्यात जवळपास 22 पेक्षा अधिक पोलीस ठाणे आहेत.या ठिकाणी पोलोस निरीक्षक किंवा सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.प्रत्येक ठाण्यात डीबी अथवा इतर पथक आहेत,मग अवैध धंद्यावर कारवाई का होत नाही.डीबी चे लोक केवळ कलेक्शन करण्यात व्यस्त आहेत का अशी देखील चर्चा होत आहे.