December 10, 2022

पेठ बीड ठाण्यातून दोन आरोपी फरार !

पेठ बीड ठाण्यातून दोन आरोपी फरार !

बीड- गुटखा तस्करी प्रकरणात एसपींच्या विशेष पथकाने पकडलेले दोन आरोपी पेठ बीड पोलीस ठाण्यातून फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रभर आरोपींचा शोध सुरू आहे.या प्रकरणात दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.या पथकाने शनिवारी बार्शी नाका भागात एक जीप पकडली.ज्यामध्ये 8 लाखाचा गुटखा सापडला.या प्रकरणात शेख मोहसीन आणि शेख इकबाल या दोघांना अटक केली.

या आरोपींना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.त्यावेळी आरोपीनी मळमळ होत असल्याचा बहाणा करत पोलीस शिपाई संजयकुमार राठोड यांच्या तावडीतून हे दोघे फरार झाले.या आरोपींचा शोध घेण्यासाठी रात्रभर पोलीस पथके गस्त घालत होते.

या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click