December 10, 2022

राखेच्या तलावात बुडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू !

राखेच्या तलावात बुडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू !

परळी- औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राजवळ असलेल्या राखेच्या तलावात बुडून एका चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.साक्षी साईनाथ पवार ही चार वर्षीय चिमुकली भावंडांसोबत खेळत असताना ही घटना घडली.।

आपल्या भावंडांबरोबर खेळत खेळत राखेच्या तलावात पडून चार वर्षिय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना येथील औष्णिक विद्युत केंद्र परिसरात आज गुरुवारी ( दि. २५ ) सकाळी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साक्षी साईनाथ पवार ( वय ४ वर्ष ) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेच्या साठवणूकीसाठी तलाव आहे. या तलावा पासून काही अंतरावर पवार कुटुंब रहाते. आज सकाळी तीन लहान भावंडे खेळत -खेळत या राखेच्या तलावा जवळ आले. यावेळी साक्षी व तीची बहीण या राखेच्या तलावात पडल्या यामध्ये पावसामुळे पाणी साचले आहे. त्यात बुडू लागल्या हे पहाताच ७ वर्षांच्या भावाने घरी जाऊन वडीलांना माहिती दिली. 

त्यानंतर साईनाथ पवार हे घटनास्थळी गेले,त्यांनी दोन्ही मुलींना बाहेर काढले मात्र तोपर्यंत साक्षी चा अंत झाला होता.या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click