बीड- जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचे अन त्यावरून डीवायएसपी सह पोलिस निरीक्षकावर कारवाई झालेली असताना अवैध धंदे काही बंद होत नसल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसात अनेक ठाण्यांच्या हद्दीत एसपी चे विशेष पथक कारवाई करत असल्याचे चित्र आहे.मग संबंधित ठाणे प्रमुख नेमकं करतात काय असा प्रश्न निर्माण होत आहे.तसेच विशेष पथकाच्या कारवाई बद्दल देखील शंका उपस्थित केली जात आहे.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत.एसपी कोणीही येवो हे दोन नंबर वाले त्यांच्या कलेक्शन वाल्याला मॅनेज करतात अन आपले धंदे सुरूच ठेवतात.जिल्ह्यातील वाळू,मटका,गुटखा,पत्याचे क्लब याबाबत यापूर्वी विधानसभेत घमासान चर्चा झाली.त्यानंतर तत्कालीन एसपी आर रामस्वामी यांची बदली देखील झाली.
त्यांच्या जागी नवे एसपी ठाकूर आले,पण अवैध धंदे काही बंद झालेच नाहीत.नव्या एसपी नि आलेले विशेष पथक नियुक्त करत अवैध धंदे वाल्याना इशारा दिला.मात्र या पथकाला कस खुश करायचं हे देखील या दोन नंबर वाल्याना माहीत आहे.
महिन्यातून एक दोन केसेस घ्याव्या लागतात म्हणून विशेष पथक आले की दहा वीस हजार रुपयांची कारवाई केल्याचे दाखवले जाते.गेल्या काही दिवसात बीड शहर,बीड ग्रामीण,पेठ बीड,शिवाजी नगर,सिरसाला,वडवणी ,माजलगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीत या विशेष पथकाने कारवाई केल्याचे प्रेस नोट मधून समजले.
जर का विशेष पथकाला अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळते तर संबंधित ठाणेदार काय करतात,ते केवळ शासनाचा पगार अन तोडीपाणी करण्यातच व्यस्त आहेत का? एसपी ठाकूर हे अशा ठाणेदारांवर कारवाई करणार का हा खरा प्रश्न आहे.
एसपी नि जे विशेष पथक नियुक्त केले आहे ते काम केल्याचा दिखावा करत आहे,मात्र यापूर्वी या पथकाने काय काय दिवे लावले आहेत अन कोणा कोणाला एडजेस्ट केले आहे याचीही माहिती घेण्याची गरज आहे.हे पथक म्हणजे आणखी एक घर वाढल्याची भावना दोन नंबर वाले व्यक्त करत आहेत.जिल्ह्यात प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असताना हे पथक ठराविक ठाण्याच्या हद्दीतच कारवाई करते बाकीच्या ठिकाणी कारवाई का होत नाही अशी देखील चर्चा सुरू आहे.