December 10, 2022

चारा छावणीचे 15 कोटी आले !

चारा छावणीचे 15 कोटी आले !

बीड – तब्बल चार वर्षांपूर्वी दुष्काळाच्या काळात उभारण्यात आलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांचे 15 कोटी रुपये अनुदान विभागीय आयुक्त यांच्याकडे प्राप्त झाले असून लवकर त्याचे वितरण करून अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.त्यामुळे चार वर्षांपासून बिलासाठी ताटकळणाऱ्या छावणी मालकांना दिलासा मिळाला आहे.

2018 साली राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात आलेल्या होत्या.विशेषतः बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर छावण्या उभारल्या गेल्या होत्या.यामध्ये बहुतांश छावण्या या राजकिय पुढारी आणि कार्यकर्त्यांच्या होत्या.

मात्र गेल्या चार वर्षांपासून या छावण्यांची कोट्यवधी रुपयांची बिले अडकून पडली होती.बीड जिल्ह्यातील तब्बल 13 कोटी पेक्षा अधिकची बिले अडकून पडली होती.राज्य शासनाने मार्च 2022 ला ही बिले काढण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.मक्तर तांत्रिक अडचणीमुळे बिले पुन्हा अडकली.

अखेर आता ही बिले अदा करण्यासाठी निधी वितरित झाला असून 15 कोटी पेक्षा अधिकचा निधी विभागीय आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. लवकरात लवकर ही बिले अदा करून अहवाल शासनाकडे पाठवावा असे पत्र आयुक्त यांना मिळाले आहे.त्यामुळे छावणी मालकांचा जीव भांड्यात पडला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click