December 10, 2022

ओरिसातून गांजा तस्करी करणारी बीडची टोळी जेरबंद !

ओरिसातून गांजा तस्करी करणारी बीडची टोळी जेरबंद !

बीड-ओरिसा राज्यातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या बीडच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून तब्बल एक कोटी तीस लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या आरोपीनी यापूर्वी देखील विशाखापट्टणम येथून गांजाची तस्करी केल्याचे समोर आले आहे.

गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीला रचकोंडा पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून 590 किलो गांजा जप्त करण्यात आला. रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील परशुराम हा त्याच्या टोळीतील सदस्यांसह ओडिशा येथून गांजा महाराष्ट्रात आणत होता. दोन वाहनांमधून एकूण 590 किलो गांजा 104 पॅकेटमधून महाराष्ट्रात घेऊन जात होता. या गांजाची एकूण किंमत 1 कोटी 30 लाख रुपये इतकी असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 संतोष गायकवाड, अजय महादेव इथापे, आकाश शिवाजी चौधरी, विनोद गाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आारोपी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहेत.

गांजाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलबी नगर एसओटी पोलीस आणि अब्दुल्लापूर मेट पोलिसांनी नियोजन करून छापा टाकून आरोपींना अटक केली आहे. याआधी देखील करोडो रुपयांचा गांजा पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने तेलंगाणात पकडला होता. आज अशाच प्रकारची कारवाई रचकोंडा पोलिसांनी केली आहे.

आरोपींकडून गांजासह दोन कार, 8 मोबाईल फोन आणि 1900 रुपये रोख जप्त करण्यात आली आहे. तसेच मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या साईकुमारलाही पोलिसांनी सूर्यपेठ येथून अटक केली आहे. मुख्य आरोपी परशुराम याला यापूर्वी विशाखापट्टणममध्ये गांजाची वाहतूक करताना अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर वनस्थलीपुरम पीएसमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click