बीड- बदली होऊन गेलेल्या आरटीओ च्या खोट्या सह्या करून जेसीबी ची पासिंग केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उघडकीस आला आहे.या प्रकरणी वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल आणि एजंट सय्यद शाकेर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अंदाधुंद कारभार सुरू आहे.या कार्यालयात सामान्य माणसाचे सरळमार्गी कामच होत नाही.तुम्हाला किरकोळ काम असेल तरीसुद्धा एजंट गाठावा लागतो.कार्यालयाबाहेर अनेक एजंट दुकान थाटून बसले आहेत.कार्यालयातील अधिकारी आणि या एजंट लोकांची मिलीभगत आहे.
लायसन काढायचे असो की पासिंग करायची असो या कार्यालयात एजंट ला हाताशी धरल्याशिवाय काहीच काम होत नाही.आरटीओ असो की कार्यालयातील कर्मचारी सगळे एजंट कडून आलेल्या फाईल ला प्राधान्य देतात.शंभर रुपयांचे काम करण्यासाठी एजंट लोक हजार हजार रुपये उकळतात.
त्यामुळे या एजंट लोकांचे धाडस देखील वाढले आहे.यापूर्वी एका गुन्ह्यात काही महिने जेलची हवा खाऊन आलेला एजंट सय्यद शाकेर याने वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल यांना हाताशी धरून जुन्या आरटीओ च्या सह्या स्वतःच करत जेसीबी ला पासिंग करून दिली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसात शाकेर आणि डेडवाल यांच्याविरोधात कलम 409,420,120,468,471 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.