December 10, 2022

परळी,अंबाजोगाई च्या दरोडेखोरांना बेड्या !

परळी,अंबाजोगाई च्या दरोडेखोरांना बेड्या !

लातूर – दिवसभर चारचाकी गाडीतून फिरत फिरत रेकी करायची,जे घर दिवसभर बंद आहे ते हेरायचे अन रात्री त्या ठिकाणी दरोडा घालून लाखो रुपयांची लूट करायची.लातूर,बीड,नांदेड या भागात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूर पोलिसांनी जेरबंद केली आहे.या टोळीकडून एक किलो सोन्यासह पन्नास ते पंचावन्न लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर शहरातील एका दरोड्याचा तपास करताना पोलिसांना ही टोळी हाती लागली आई.यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई आणि परळी भागातील हे सराईत गुन्हेगार आहेत. नॅशनल परमिट चार चाकी वाहन भाड्याने करून सावज हेरत मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात फिरत असत. दिवसभरात बंद असलेले घर हेरून रात्री घरफोडी करत असत. घरफोडी केल्यानंतर विदर्भातील यवतमाळ किंवा नागपूर सारख्या भागात ते निघून जात असत. यातील अनेक आरोपी हे पुण्याच्या विविध भागात वास्तव करून राहत होते. दोन ते तीन महिने सराईत पद्धतीने गुन्हेगारी करून विदर्भ मार्गे पुण्याकडे जाऊन पुढील काही महिने ते लपून बसत असत. मात्र यावेळी पोलिसाच्या पथकांनी त्यांना यवतमाळच्या भागातच ताब्यात घेतलं. यातील अनेक आरोपींवर वीस ते पंचवीस गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालं आहे

पोलिसांनी लखन उर्फ अमरदीप जोगदंड राहणार अंबाजोगाई हल्ली मुक्काम पुणे, किशोर उर्फ पप्पू जोगदंड राहणार अंबेजोगाई हल्ली मुक्काम पुणे आणि प्रवीण उर्फ डोळ्या माने अंबेजोगाई यांना ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या साथीदारांची ही नावं सांगायला सुरुवात केली. यात सूर्यकांत मुळे अंबाजोगाई, अविनाश देवकर अंबाजोगाई, सुरेश ऊर्फ सुर्यकांत गंगणे अंबाजोगाई , सुदर्शन ऊर्जा सोन्याने परळी ही नावं समोर आली.

या सात आरोपींकडून पोलिसांनी नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यात केलेल्या घरफोडीबाबत तपास केला. एकूण 13 ठिकाणी घरफोडी केल्याचं या चोरांनी कबूल केलं आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून तब्बल 900 ग्रॅम सोन्याची दागिने अंदाजे किंमत 45 लाख रुपये, 500 ग्रॅम चांदी अंदाजे किंमत 33 हजार रुपये, रोख एक लाख वीस हजार रुपये, एक कार, असा एकूण 52 लाख रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click