October 5, 2022

डीवायएसपी जायभायेची बदली तर मोरे सस्पेंड !

डीवायएसपी जायभायेची बदली तर मोरे सस्पेंड !

मुंबई-अवैध धंद्यांना कायदेशीर पोलीस संरक्षण देत हप्ते वसुली करणाऱ्या डीवायएसपी जायभाये यांची तातडीने बदली करत ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.केज च्या आ नमिता मुंदडा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

जिल्ह्यातील धोक्यात आलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच फोफावलेले अवैध धंदे या प्रश्नावर यापूर्वीच्या विधानसभा अधिवेशनात बरीच चर्चा झाली होती,त्यावरून तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांची तडकाफडकी बदली देखील झाली होती.

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणे , त्यांना पाठीशी घालणे या प्रकरणी झालेल्या चौकशीत संबधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याची तसेच संबंधी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचीही अन्यत्र बदली करण्याची घोषणा उपुख्यमंत्रि तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली


नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर संबधित पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click