January 30, 2023

सोमवारी बीड बंद !

सोमवारी बीड बंद !

बीड – शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आ विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी म्हणून सोमवारी बीड जिल्हा बंद चे आवाहन केले आहे.

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे लढवय्ये नेते तथा मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे माजी आ.विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे बीड जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. ही पोकळी कधीही भरुन येणार नाही.विनायकराव मेटे यांच्या पार्थीवावर उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारी बीड शहरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने उद्या 15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून सर्व व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून मेटे साहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करावी असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी आणि बीड शहर अध्यक्ष विनोद पिंगळे व इतर पदाधिकार्‍यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी नमुद केले आहे की, बीड जिल्ह्यातील धडाडीचे नेते, माजी आ.विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याची मोठी हानी झाली आहे. त्यांचे मराठा आरक्षण, ऊसतोड कामगारांचे प्रश्न यातील योगदान कधीही विसरता येणार नाही. सामाजिक विषयांवर आवाज उठवणार्‍या नेत्याला संपूर्ण राज्य मुकले आहे.त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून मेटे साहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करावी असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी आणि बीड शहर अध्यक्ष विनोद पिंगळे व इतर पदाधिकार्‍यांनी केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click