December 10, 2022

माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल !पंकजा मुंडे यांचा घरचा आहेर !!

माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल !पंकजा मुंडे यांचा घरचा आहेर !!

मुंबई- राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मध्ये मंत्रिपद मिळण्याएव्हढी माझी पात्रता नसेल त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसेल अस म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

शिंदे फडणवीस सरकारचा लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला.शिंदे आणि भाजपच्या वतीने प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपकडून माजीमंत्री पंकजा मुंडे यांना मंत्रिपद डावलले.बीड जिल्ह्यात एकही मंत्रिपद न दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

दरम्यान रक्षाबंधन च्या दिवशी पंकजा मुंडे यांनी माजीमंत्री महादेव जानकर यांना राखी बांधली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाल्या की,कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद मिळाले नसेल.ज्या लोकांची पात्रता आहे त्यांना मंत्रिपद दिलं गेलं आहे.मात्र त्यामुळे आपण नाराज झालो नाहीत अन कार्यकर्ते देखील नाराज नाहीत.

आपण आपलं काम करत राहायचं,पदासाठी आपण कधी काम केलं नाही.या सरकारने ओबीसींच्या आरक्षणाच्या विषयावर लक्ष घालून ओबीसी आरक्षणाची रक्षा करावी असे मत त्यांनी मांडले.

पंकजा मुंडे यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्या मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click