October 5, 2022

जायकवाडी धरणातून 30 हजार विसर्ग सुरू ! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा !!

जायकवाडी धरणातून 30 हजार विसर्ग सुरू ! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा !!

बीड- नाशिक व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने नाथसागर धरणात आवक वाढली आहे.धरण 94 टक्के भरल्याने गोदावरी नदीपात्रात 30 हजार क्यूसेक्स एवढा विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला असतांना धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये सुद्धा वाढ होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) होणारी आवक सुद्धा वाढली असल्याने यावर्षी दुसऱ्यांदा धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेतत्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सद्या धरणातून एकूण 30 हजार 485 क्युसेकने विसर्ग करण्यात येत असून, 27 हजार 155 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. जायकवाडीत सकाळी 6 वाजता 94.83 टक्के पाणीसाठा होता.

जायकवाडी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाचे दार क्रमांक 10 ते 27 उघडण्यात आले आहेत. अठराही दरवाज्यातून 1.5 इंच वरती करून पाणी सोडले जात आहे. उघडण्यात आलेल्या अठरा दारातून 28 हजार 296 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. तर जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्युसेक आणि उजव्या कालव्यातून 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून सद्या एकूण 30 हजार 485 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावर्षात दोनदा जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click