April 1, 2023

तलाठी,ग्रामसेवकांचा कारभार खाजगी लोकांच्या भरवशावर !

तलाठी,ग्रामसेवकांचा कारभार खाजगी लोकांच्या भरवशावर !

बीड- बीड जिल्ह्यातील बहुतांश तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या कार्यालयाचा कारभार सर्रास खाजगी व्यक्तींकडून चालवला जातो.हे खाजगी लोक कामासाठी येणाऱ्या लोकांची आर्थिक पिळवणूक करतात.30 – 70 किंवा 40 – 60 या हिशोबाने याची वाटणी होते.जर खाजगी व्यक्तीकडूनच कारभार करायचा तर या तलाठीण ग्रामसेवक मंडळींना पगार द्यायचा कशाला असा सवाल उपस्थित होत आहे.

बीड शहरातील पिंगळे तरफ येथील तलाठी घोडके यांच्या कार्यालयातील खाजगी इसम शेख खमर याला 3 हजाराची लाच घेताना अटक झाली अन सरकारी कार्यलयातील या खाजगी लोकांच्या वावरा बद्दल चर्चा सुरू झाली.

बीड जिल्ह्यात विशेषतः शहरानजीक असलेल्या गावामध्ये जे तलाठी कार्यालय आणि ग्रामसेवक कार्यालय आहेत त्या ठिकाणी एकदा का होईना अचानक तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांनी चक्कर मारून पहावे.बीड शहरात असलेल्या तलाठी कार्यालयात तर दिवसभरात एखादा तास मूळ तलाठी महाशय येतात अन दिवसभर खाजगी लोक काम करत बसलेले असतात.

बीड,गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, परळी,आष्टी या शहर लगत जे तलाठी सज्जे आहेत त्या ठिकाणी कमाई मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हे सगळे अप्पा तलाठी बडे बडे मासे शोधण्यात व्यस्त असतात.मग त्यांची सगळी काम खाजगी लोक करतात.

विशेष म्हणजे महसूल विभागाचा कोणताही कार्यक्रम असो की मंत्र्यांचा,मोठ्या अधिकाऱ्यांचा दौरा ,जाण्या येण्यापासून सगळी बडदास्त ठेवण्याची जबाबदारी ही याच तलाठी महाशय यांच्याकडे असते.उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार हे तलाठ्यांना आदेश देतात अन मग चहापासून ते रात्रीच्या व्यवस्थेपर्यंत सगळं काम तलाठी महाशय चोखपणे पार पाडतात.

हे तलाठी महाशय तहसीलदार असो की जिल्हाधिकारी यांच्या गळ्यातील ताईत असतत् त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमीच असते.बर जी गोष्ट तलाठी महाशय यांची तीच ग्रामसेवक यांची सुद्धा आहे.शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो,या ठिकाणी मलिदा सुद्धा मोठा मिळतो.त्यामुळे ग्रामसेवक महाशय आपल्या जागेवर गावातीलच एखाद्या होतकरू तरुणाला कामावर ठेवतात अन आपण मात्र राजकारण करण्यात अन साहेबांच्या खुशमस्करीत गुंग असतात.

या अशा लोकसेवकांमुळे प्रशासनची मात्र नाहक बदनामी होते अन जनतेला त्रास सहन करावा लागतो,त्यामुळे याला आवर घालण्याची मागणी जनतेतून होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click