बीड- शहरातील पिंगळे तरफ चा तलाठी घोडके याच्या हाताखाली काम करणारा खाजगी व्यक्ती शेख खमर याने तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली.मात्र मूळ सूत्रधार लाचखोर तलाठी घोडके मात्र निसटला.ज्याच्यासाठी लाच मागितली त्याच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खरेदी केलेल्या प्लॉट ची फेरफार नोंद करण्यासाठी पिंगळे तरफ चे तलाठी घोडके आणि त्यांचा खाजगी व्यक्ती शेख खमर याने तीन हजार रुपयांची मागणी केली.याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर सापळा रचण्यात आला.
पिंगळे तरफ चा तलाठी घोडके याच्यासाठी शेख खमर हा खाजगीत काम करतो.घोडके केवळ कागदावर सह्या करण्याचा पगार शासनाकडून घेतो.या लाचखोर घोडके ची तक्रार आली मात्र कारवाई त्याच्या नावाने लाच मागणाऱ्या शेख खमर वर झाली.घोडके मात्र निसटला.
तक्रारदाराने घोडके हा तलाठी असून तो आणि खमर हे दोघे लाच मागत असल्याची तक्रार केली.मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केवळ।खमर वर गुन्हा का दाखल केला.घोडके ने अशी काय जादू केली.हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.