मुंबई – एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या राजपत्रित आणि अ राजपत्रित संवर्गातील परीक्षा मध्ये एमपीएससी ने पुढच्या वर्षीपासून मोठे बदल केले आहेत.यापुढे आता केवळ दोनच संवर्गातून परीक्षा होईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
एमपीएससी ने दिलेल्या माहितीनुसार 2023 पासून आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येणार आहे.
राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट “अ’, “ब’ संवर्गातील पदभरतीसाठी “महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा’ या नावाने संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांकडून अर्ज घेताना सर्व संवर्गासाठी अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. त्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित केली जाईल व प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे सर्व अराजपत्रित गट “ब’, “क’ संवर्गासाठी “महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. त्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सर्व अराजपत्रित गट “ब’, “क’ संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम संवर्गांच्या भरतीप्रक्रियेमध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
अशा स्वरूपात होतील परीक्षा
सर्व राजपत्रित गट “अ’, “ब’: राज्य सेवा, कृषी, वनसेवा, इंजिनिअरिंग. मुख्य परीक्षा लेखी होणार
सर्व अराजपत्रित गट “ब’, “क’ : पूर्वीची संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात
पीएसआय शारीरिक चाचणीसाठी 70 गुणांची अर्हता