January 30, 2023

अपघातातील जखमींचा जीव वाचविण्यासाठी अस्थीरोग संघटनेचा पुढाकार !

अपघातातील जखमींचा जीव वाचविण्यासाठी अस्थीरोग संघटनेचा पुढाकार !

बीड- देशात दरवर्षी घडणाऱ्या तब्बल चार लाखापेक्षा अधिक अपघातात दीड लाखापेक्षा अधिक लोकांना जीव गमवावा लागतो.अपघातातील जखमींना तातडीने प्रथमोपचार भेटल्यास हजारो जीव वाचवणे शक्य आहे.त्यामुळे भारतीय अस्थीरोग संघटनेच्या राज्य शाखेच्या वतीने जीवन रक्षक व प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे.यामधून हजारो विद्यार्थी, पोलिस आणि नागरिकांच्या माध्यमातून जीव वाचवा मोहीम यशस्वी केली जाणार आहे अशी माहिती अस्थीरोग संघटनेचे उपाध्यक्षडॉ प्रमोद शिंदे यांनी दिली.

सन २०१२ पासून, भारतीय अस्थिरोग संघटना, प्रतिवर्षी ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर अस्थि व सांधे आरोग्य दिन (Bone and Joint Day) साजरा करत असते. प्रतिवर्षी १ते ७ ऑगस्ट, संपूर्ण देशभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.

२०२२ यावर्षी साठी भारतीय अस्थिरोग संघटना प्रत्येकाने रस्ते अपघातातील एक जीव वाचवावा (each one Save one) ही थीम राबवणार आहे.
भारतामध्ये रस्त्यांवरील अपघातात जाणाऱ्या बळींची संख्या रोखणे हा मुख्य उद्देश आहे.
२०१८ च्या जागतिक आकडेवारी नुसार १९९ देशांपैकी रस्ते अपघात मधील बळींची आकडेवारीनुसार भारत देश प्रथम क्रमांकावर आहे. आपल्यानंतर चीन आणि अमेरिका यांची आकडेवारी आहे.


२०१९-२०च्या आकडेवारीनुसार भारतातील संपूर्ण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण ४,४९,००२ एवढ्या अपघातांची नोंद आहे. यापैकी १,५१,११३ लोकांना आपला जीव गमवावा लागला. ४,५१,३६१ लोकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या.
१८ ते ४५ वर्ष वयोगटाच्या तरुण रुग्णांचे अपघात ग्रस्त होण्याचे प्रमाण ६९.३ टक्के आहे. १८ ते ६० या काम करणाऱ्या ग्रुप मधील लोकांचे अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण ८४.३ टक्के इतके जास्त आहे. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या मध्ये ८६ टक्के पुरुष आहेत, जे बऱ्याच वेळा कुटुंबाचा एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत असतात.
यातील बरेचसे मृत्यू अपघातानंतर तातडीची वैद्यकीय मदत , अपघातानंतर पहिल्या तासात ( गोल्डन आवर) मध्ये न मिळाल्यामुळे झालेले आहेत. यातील बरेचसे मृत्यू अपघातानंतर योग्य प्रकारचे प्रथम उपचार दिल्यानंतर टाळता येऊ शकतात. परंतु,‌सध्या, अशा प्रकारच्या जीवन रक्षक प्रथमोपचार व मदतीच्या प्रशिक्षणाचा खूपच अभाव दिसून येतो. अशा प्रथमोपचारांचे प्रशिक्षण आपण अनेक तरुण, विद्यार्थी, पोलीस यांना सहजरीत्या देऊ शकतो.


आम्ही महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेच्या वतीने,‌असे जीवन रक्षक व प्रथमोपचार प्रशिक्षण, महाराष्ट्रभरातील हजारो विद्यार्थी पोलीस व तरुणांना देण्याचे ठरवले आहे.१ ते ७ ऑगस्टदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे सदस्य असे प्रशिक्षण देणार आहेत. तसेच संपूर्ण देशभर देखील भारतीय अस्थिरोग संघटना असे प्रशिक्षण देणार आहे. . संपूर्ण देशभर लाखो जीवन रक्षक तयार करण्याचा संघटनेचा मानस आहे. या प्रशिक्षणाची लिम्का बुक मध्ये रेकॉर्ड नोंदविण्याचा मानस आहे.
यासोबतच आपली हाडे आणि स्नायू बळकट ठेवण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचेडॉ.वासुदेव गाडेगोने अध्यक्ष,
डॉ. एन जे कर्णे, सचिव, डॉ.प्रमोद शिंदे, राज्य
उपाध्यक्ष तसेच बीड येथील शाखेचे अध्यक्ष डॉ.प्रवीण देशमुख सचिव डॉ.सुरेश मुंडे यांनी दिली आहे.सर्व अस्थिरोग तज्ञ या प्रशिक्षिनात सहभागी होऊन सहभाग नोंदवणार आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click