October 5, 2022

गौण खनिजांची लूट ! तहसील प्रशासनाची डोळेझाक !!

गौण खनिजांची लूट ! तहसील प्रशासनाची डोळेझाक !!

बीड- बीड तालुक्यातील गौण खनिजांची दिवसाढवळ्या लूट केली जात आहे.समनापूर, आहेर वडगाव,पाली,वांगी यासह आसपासच्या गावातील डोंगर भुईसपाट केले जात आहेत.मात्र तहसीलदार आणि प्रशासन याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.

बीड तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषतः शहराच्या आसपास असलेल्या डोंगर, दरी,खदानी या ठिकाणी दररोज हजारो ब्रास मुरूम,दगड,माती याचे खोदकाम सुरू आहे.विशेषतः समनापूर,वांगी,काठोडा, मोची पिंपळगाव, वायभट वाडी,आहेर वडगाव,पाली,पांगर बावडी ,नाळवंडी, अंथरवन पिंप्री यासह बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात डोंगर,दऱ्या आणि खदानी आहेत.

या ठिकाणाहून दररोज किमान चारशे ते पाचशे ट्रक, हायवा आणि ट्रॅक्टर मधून या गौण खनिजांची लूट सुरू आहे.मनाला येईल तेथे खोदकाम सुरू करायचे,डोंगर,खदानी भुईसपाट करायच्या हा उद्योग सुरू आहे.याकडे ना तहसीलदार ना गौण खनिज विभागाचे लक्ष आहे.बीड शहराच्या बाहेरून जो बाह्यवळणं (बायपास) रस्ता गेला आहे,तेथुन नजर टाकल्यास कशा पद्धतीने गौण खनिजांची लूट सुरू आहे हे लक्षात येते.

या भागातील गौण खनिजांची सर्रास लूट सुरू असताना प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे.निसर्गावर अतिक्रमण करून डोंगर भुईसपाट करण्याचे जे षड्यंत्र सुरू आहे त्यावर कोणी निर्बंध घालणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click