January 30, 2023

दिल्लीवारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आधार द्या – पवार !

दिल्लीवारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आधार द्या – पवार !

अंबाजोगाई – राज्यात दोघांचेच सरकार आहे,ना मंत्री,ना पालकमंत्री, त्यामुळे सर्वसामान्य माणूस अन शेतकरी हैराण झाला आहे.अतिवृष्टीमुळे पिकाचे,जनावरांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुसत्या दिल्लीवाऱ्या करण्यापेक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत असा सल्ला राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिला.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी या भागात थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पवार यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.गोगलगायी मुळे पिकाचे झालेले नुकसान मोठे आहे,या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली.यावेळी माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आ संदिप क्षीरसागर, आ सतीश चव्हाण, माजी आ अमरसिंह पंडित,संजय दौड आदि उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात गोगलगायी चा प्रादुर्भाव मोठा आहे.अशा प्रकारचे संकट शेतकऱ्यांना भेडसावल्यास कृषी विभाग विविध तंत्रज्ञान शोधून यावर उपाययोजना शोधणे, शास्त्रज्ञ व्यक्तींना नवीन उपाय शोधायला लावणे, कृषी विद्यापीठातील उपलब्ध माहितीचा विनियोग करणे अशा गोष्टी अपेक्षित असतात, मात्र इथे दोनच व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून राज्याचे सरकार चालवत असून ते प्रत्येक खात्याशी संबंधित प्रत्येक नागरिकांचे समाधान करू शकत नाहीत, याची त्यांना जाणीव असायला हवी, असेही अजितदादा पवार यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार नाही, जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत त्यामुळे पीकविमा, कृषी कर्ज, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अशा अनेक बाबी प्रलंबित असल्याचेही यावेळी अजितदादा पवार यांनी नमूद केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click