December 10, 2022

अतिवृष्टीमुळे मराठवड्यात मोठे नुकसान !

अतिवृष्टीमुळे मराठवड्यात मोठे नुकसान !

बीड- मराठवाड्यात गेल्या दहा बारा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड,जालना वगळता बहुतांश भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः नांदेड,परभणी,हिंगोली या जिल्ह्यात शेतीपिकासह जीवित आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे.

जुलै महिन्यात पावसाने मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यातील १८२ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हे सोडले तर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम दिसून आला. जालन्यात २५५.७४ हेक्टर शेतीचे, परभणीत १२००, हिंगोलीत ७६ हजार ७७१ हेक्टर, नांदेडमध्ये २ लाख ९८ हजार ८६१ हेक्टर बीडमध्ये २६.८० हेक्टर आणि लातूरमध्ये १६४०.५७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात जवळपास ६ लाख २१ हजार ६९४ शेतकरी बाधित झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे पावसात जीवित आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा विचार करता ४३ जणांचा वीज कोसळून आणि पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांची ५३९ जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर १३९० घरांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाला असून ५०९ रस्ते ४६० पुल आणि सिंचनाच्या योजनांचे नुकसान झालं. या दुरुस्तीसाठी ४३३ कोटींचा निधी लागणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील १५७० गाव बाधित झाली आहेत. ज्यामध्ये ५ लाख ३३ हजार ३८४ शेतकरी, हिंगोली जिल्ह्यात ६२ गाव बाधित झाली. ज्यात ८५६०० शेतकरी, परभणी जिल्ह्यात ३ गावांमधे १५०० शेतकरी, लातूर जिल्ह्यात ८ गावांमधे ७७५ शेतकरी, बीड जिल्ह्यात १ गावात ५८ शेतकरी, जालना जिल्ह्यात १ गावात ३७७ शेतकरी बाधित झाले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click