बीड – माजी खा स्व केशरकाकू क्षीरसागर यांच्यामुळे उभा राहिलेला आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे सुरू असलेला मात्र गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला गजानन सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होतो आहे.आ संदिप क्षीरसागर यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर यांच्या ताब्यात एमेस्सी बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिला.यावेळी आ संदीप क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर यांच्यासह इतर अनेक जण उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून बंद असलेला गजानन सहकारी साखर कारखाना लि. सोनाजीनगर, राजुरी नवगण, ता.बीड येथे आज डी.व्ही.पी. कमोडीटी एक्सपोर्ट प्रा. लि. कंपनीच्या डायरेक्टर- सौ.नेहा संदिप क्षीरसागर
डायरेक्टर- श्री. अमर धनंजय पाटील
यांच्याकडे बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्री. खेडेकर यांनी प्रत्यक्ष गजानन सहकारी साखर कारखाना लि. सोनाजीनगर येथे येऊन बँकेच्या वतीने ताब्यात दिला.
यावेळी गजानन सहकारी साखर कारखानाचे चेअरमन रविंद्र दादा क्षीरसागर, डी.व्ही.पी. कमोडीटी एक्सपोर्ट प्रा. लि. कंपनीचे अधिकारी, महंत अमृतदास जोशी महाराज, मा.आ. सय्यद सलीम साहेब मा.आ.सुनिल दादा धांडे, वैजिनाथ नाना तांदळे, बँकेचे अधिकारी, पंचक्रोशीतील शेतकरी बांधव, ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.