बीड- जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण जाहीर झाले असून जिल्ह्यातील तब्बल नऊ गट एससी समाजासाठी आरक्षित झाले आहेत.विशेष म्हणजे यामध्ये बीड तालुक्यातील चौसाळा आणि पिंपळनेर हे दोन जिल्हा परिषद गट आरक्षित झाले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आयोग कामाला लागला आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या गटांसाठी आरक्षण जाहीर झाले,यामध्ये बीड जिल्हा परिषदेच्या नऊ गटाचे आरक्षण एससी साठी जाहीर झाले आहे.
यामध्ये चौसाळा, पिंपळनेर, उमापूर,मोगरा ,किट्टीआडगाव,मुर्षदपूर,होळ, भोगलवाडी,बरदापुर हे गट आरक्षित झाले आहेत.त्यामुळे अनेक भावी अन इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.यातील उमापूर,मुर्षदपूर,भोगलवाडी,पिंपळनेर आणि किट्टीआडगाव हे सर्कल एससी महिलांसाठी राखीव झाले आहेत.