बीड-नाशिक व परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नाथसागर धरण 90 टक्के भरले आहे,त्यामुळे गोदावरी नदीपात्रात 9 हजार 700 क्यूसेक्स एवढ्या पाण्याचा विसर्ग सुरुकरण्यात आला आहे.नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाशिक व नगर परिसरात भरपूर पाऊस झाल्याने जायकवाडी धरण ९० टक्के क्षमतेपर्यंत भरले आहे.उद्या सकाळी १० वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार होते.परंतु जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने धरणातून आज सायंकाळी ६.३० वाजता धरणातून 9 हजार 7०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
गेल्या आठ दहा दिवसापासून नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे.त्यामुळे या भागातील धरणे,नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत.नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सोडले जाणारे पाणी तब्बल एक लाख क्यूसेक्स प्रमाणे जायकवाडी धरणात येत आहे.नाथसागर धरण 90 टक्के भरले आहे.
त्यामुळे जायकवाडी पाटबंधारे विभागाने सायंकाळी 6 वाजेपासून गोदावरी नदीपात्रात 9 हजार 700 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यातील 85 गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.