पाटोदा – गुटख्याचा ट्रक पकडल्यानंतर त्यातील काही माल काढून घेणाऱ्या पोलिसांना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी निलंबित करत चांगलाच दणका दिला आहे.पाटोदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह तिघांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे.अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा पकडला.गुटखा,मटका,वाळू यामध्ये पोलिसच सहकार्य करत असल्याचे अनेकवेळा समोर आले.मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने अवैध धंदे करणारे लोक पोलिसांच्या सहकार्याने आलेले धंदे करत होते.
पाटोदा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गुटख्याचा टेम्पो पकडला.या टेम्पोमध्ये 50 पोते गुटखा असल्याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना होती.प्रत्यक्षात पाटोदा पोलिसांनी केवळ 27 पोते आढळून आल्याचे दाखवले आणि 23 पोती गुटखा दुसऱ्या ठिकाणी उतरवून तोडीपाणी केली.
याबाबत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चौकशी करून पाटोदा पोलीस ठाण्याचे सपोनि धरनिधर कोळेकर,संतोष क्षीरसागर आणि कृष्णा डोके या तिघांना तडकाफडकी निलंबित केले आहे.या कारवाईने ठाकूर यांच्याबद्दल दरारा वाढला आहे.