October 5, 2022

परळीत महात्मा बसवेश्वर उद्यान ठरतेय आकर्षण !

परळीत महात्मा बसवेश्वर उद्यान ठरतेय आकर्षण !

परळी – राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून शहरात अत्यंत सुंदर असे महात्मा बसवेश्वर उद्यानाचे रविवारी उदघाटन होत आहे.या उद्यानात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा देखील उभारण्यात आला आहे.

परळी शहराच्या विद्यानगर भागात उभारण्यात आलेल्या या उद्यानात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 5 पंचाचार्यांचे प्रतीक म्हणून 5 भक्तीस्थाने, ध्यान साधना करण्यासाठी मेडिटेशन परिसर, वाचनालय, दुर्मिळ वृक्ष, यांसह वॉकिंग ट्रॅक आदी साकारण्यात आले असल्याने हे उद्यान नागरिकांसाठी बहुउयोयोगी ठरणार आहे.
या उद्यानाची उभारणी करण्यासाठी स्वतः धनंजय मुंडे यांनी लक्ष दिले असल्यामुळे परळी करांसाठी एक भव्य अन निसर्गरम्य उद्यान उभे राहिले आहे.
या कार्यक्रमास प्रसन्नरेणूक डॉ.वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत तसेच ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, ष.ब्र. शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबेजोगाई, ष.ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, माजलगाव, डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, मन्मथधाम, ष.ब्र. काशिनाथ शिवाचार्य महाराज,पाथरी, ष.ब्र. चनबसव शिवाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत.
या उद्यानात वाचनालय,भक्तीस्थळ, महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा आणि सुंदर असा वॊकिंग ट्रॅक करण्यात आला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click