December 10, 2022

किरकोळ भांडणात तरुणाची हत्या !

किरकोळ भांडणात तरुणाची हत्या !

बीड- शहरातील खंडेश्वरी भागात मित्रांच्या भांडणात एका तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. दगडाने ठेचून खून केल्यानंतर आरोपी तरुण हा घटनास्थळी च हजर होता.पेठ बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

उत्तरेश्वर उर्फ पश्या हौसराव भोसले रा नूर कॉलनी गांधीनगर बीड असे मृत तरुणाचे नाव आहे तर मारेकरी असलेल्या तरुणाचे नाव दीपक संतोष भोरे वय १९ रा . खडकपुरा पेठ बीड असे आहे .पश्याची हत्या केल्या नंतर तो घटनास्थळी होता . पेठबीड पोलिसांनी त्याला तेथूनच ताब्यात घेतले

पश्या भोसले हा आपल्या मित्रांसोबत खंडेश्वरी भागात दुपारी गेला होता.त्या ठिकाणी या सर्वांनी नशापान केले.यावेळी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले.त्यानंतर पश्या च्या डोक्यात दगड घालून त्याला मारहाण करण्यात आली.

यामध्ये तो जागीच ठार झाला.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.तेव्हा मारेकरी तरुण दीपक भोरे हा तेथेच होता.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click