January 30, 2023

बस नदीत कोसळली ! 15 ठार !

बस नदीत कोसळली ! 15 ठार !

अमरावती- इंदोर येथून अमरावती कडे निघालेली राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात तब्बल पंधरा प्रवाशी मृत्युमुखी पडले आहेत तर इतर जखमी झाले आहेत.मृत आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.ही घटना इंदोर जवळील धार येथे घडली.

मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती चन्ने यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच इंदोर पोलिसांनी आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघात एवढा भीषण होता की नदीच्या पाण्यात बुडालेल्या लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click