August 16, 2022

भगवान बाबांचे आशीर्वाद घेऊन नामदेव शास्त्रींच्या डीएम ला शुभेच्छा !!

भगवान बाबांचे आशीर्वाद घेऊन नामदेव शास्त्रींच्या डीएम ला शुभेच्छा !!

परळी – भगवानगडाचे महंत ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मुंडेंच्या परळी येथील पंढरी या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट दिली.

यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी नुकताच पार पडलेल्या धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त श्री. मुंडे यांना संत भगवानबाबा यांची भव्य प्रतिमा भेट देऊन आशीर्वाद दिला. याप्रसंगी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणीबाई मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, प्रा. निलेश आघाव आदी उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांनी देखील मुंडे कुटुंबाच्या वतीने महंत नामदेव शास्त्री यांचे स्वागत करत आशीर्वाद घेतले. आज सकाळीच संतांचे दर्शन थेट घरी लाभले, संतांच्या सान्निध्यात ईश्वर प्राप्ती होते, असा आशय सांगणाऱ्या ‘संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला…’ या अभंगवणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आला असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click