बीड- बीड जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षेत्राला धक्का देणारी बातमी शनिवारी समोर आली.वेदशास्त्रसंपन्न हभप धुंडिराज महाराज पाटांगणकर यांचे वृद्धपकाळाने सायंकाळी निधन झाले.त्यांच्या निधनाने वृत्त समजताच शेकडो भाविक भक्तांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.
मूळचे शिक्षक असणारे धुंडिराज महाराज हे वेदशास्त्रसंपन्न होते.आयुर्वेद या विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता.दुर्धर आजारावर त्यांचे निदान अतिशय परफेक्ट होते.संत जनीजनार्दन संस्थान थोरले पाटांगण चे प्रमुख होते.
गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून ते अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते.विद्यावाचस्पती म्हणून त्यांचा नावलौकिक होता.श्रीमद भागवत मुखोदगद असलेले धुंडिराज महाराज हे बीड जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्रातील मैलाचा दगड होते.
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते,शनिवारी सायंकाळी त्यांचे उपचार सुरू असताना निधनझाले.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,मुलगा,सुना नातवंडे असा परिवार आहे.